आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर संगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्हा करण्यात यावा, यासाठी सुरू असलेले संगमनेर जिल्हा कृती समितीचे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानंतर गुरूवारी मागे घेण्यात आले. 


गेल्या ४५ दिवसांपासून हे उपोषण संगमनेरमध्ये सुरू होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची दखल घेऊन आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रित केले होते. मंुबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या बैठकीत समितीने आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. 


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जिल्हा निर्मितीसाठी शासनाने समिती नेमली आहे. या समितीकडे आलेल्या माहितीचा भौगोलिक व लोकसंख्येच्या दृष्टीने अभ्यास सुरू आहे. जिल्ह्याचे विभाजन करताना वैशिष्ट्यपूर्ण स्थळे, भौगोलिक रचना व लोकसंख्या, प्रशासकीय सोयी-सुविधा यांचा विचार करून समितीच्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्यासह कृती समितीचे सर्वपक्षीय नेते, नागरिक उपस्थित होते. 


सरकारने सर्वांना विश्वासात घ्यावे : विखे 
जिल्हा निर्मितीचा निर्णय घेताना राज्य सरकारने संबंधित सर्व घटकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी यावेळी केली. 

बातम्या आणखी आहेत...