आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर टाकळी येथे एकाचा खून; चौघांविरुध्द गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे- अपघातातील जखमींना मदतीसाठी मध्यस्थी केली, म्हणून एकाचा घातपात करून विहिरीच्या पाण्यात टाकून खून करण्यात आला. याप्रकरणी कुकाणे येथील चौघांविरुध्द नेवासे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. 


मृताची पत्नी मीराबाई सुरेश बोरुडे यांनी तक्रारीत म्हटले, माझे पती सुरेश विश्वनाथ बोरुडे (४७, शहर टाकळी) हे २७ एप्रिलपासून बेपत्ता होते. २९ ला त्यांचा मृतदेह कुकाणे (ता. नेवासे) येथील अनिल विधाटे यांच्या विहिरीत आढळला. कुकाणे येथील ज्ञानेश्वर कैलास रामगुडे यांच्याकडून ७-८ महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातातील जखमींना मदतीसाठी माझ्या पतीने मध्यस्थी केली होती. त्यावरून ज्ञानेश्वर रामगुडे व सुरेश बोरुडे यांची फोनवर, तसेच समोरासमोर वादावादी होत असे. ज्ञानेश्वर कैलास रामगुडे, कैलास चिमाजी रामगुडे, लहानुबाई कैलास रामगुडे, गणेश कैलास रामगुडे (सर्व कुकाणे) यांनी घातपात करून संगनमताने आपल्या पतीला विहिरीच्या पाण्यात टाकून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून नेवासे पोलिसांनी चौघांविरुध्द भादंवि कलम ३०२, २०१, ३४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चौघांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबा लबडे, संतोष फलके पुढील तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...