आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरचे नाव करा ‘अंबिकानगर’ : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सभेत रविवारी अहमदनगरच्या नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यात आला. ‘अहमदनगरचा उल्लेख अंबिकानगर असा करा’, असे आवाहन भिडे गुरुजींनी केले. देशात हिंदुत्वावर मते मागून सरकार स्थापन झाले असले,  तरी या सरकारच्या झेंड्यात इस्लामिक पाचर असलेला रंग आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीवर आम्ही थुंकणारही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  


‘संकल्प सुवर्ण सिंहासनाचा जागर हिंदुत्वाचा’ या उपक्रमांतर्गत अायाेजित सभेत ते बोलत होते. दरम्यान, या सभेला आरपीआय व इतर संघटनांनी विरोध दर्शवला.  त्यांना ताब्यात घेण्यात आले. शहरात विविध भागांत चोख बंदोबस्त तैनात केला होता. 


भिडे गुरुजी म्हणाले, शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनासाठी प्रत्येक तालुक्यात दोन हजार धारकरींनी निधी गोळा करायचा आहे. सरकारकडे यासाठी निधी मागणार नाही आणि देऊ केला तरी घेणार नाही. धारकऱ्यांच्या हातात तलवारी असणे गरजेचे आहे, पण लोकशाही वाचवण्याचा टाहो फुटेल त्यामुळे सध्या काठ्या घेऊन धारकरी रायगडावर जातील. सुवर्ण सिंहासन रक्षणासाठी हिंदवी स्वराज्य खडा पहारा तुकडी तयार केली जाणार असून रोज २००० धारकरी कार्यरत राहणार असल्याचे भिडे यांनी सांगितले.  

बातम्या आणखी आहेत...