आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिर्डी- श्री साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांतर्फे येत्या १८ एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर अवघ्या सव्वा रुपयांत १०१ वधू-वरांचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. निमंत्रक विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अायाेजक कैलास कोते यांनी ही माहिती दिली. दुष्काळ, महागाई तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. गरीब मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर साईसिद्धी चॅरिटेबलच्या माध्यमातून शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते व सुमित्रा काेते हे गेल्या १६ वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे. आत्तापर्यंत सतराशे जोडप्यांचे विवाह या सोहळ्यात पार पडले आहेत.
आयोजकांतर्फे वधू-वरांना पोषाख, साडी, वधूसाठी मंगळसूत्र, संसाराेपयोयी वस्तू, साईंची प्रतिमा, वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन देण्यात येते. वरांची साई दर्शनानंतर घोडे, उंट व सजवलेल्या वाहनांतून ढोलताशांच्या निनादात व आतषबाजीत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या साेहळ्यास भय्यू महाराज, भास्कर गिरी महाराज, जंगली दास महाराज, कॅप्टन खरात, बोधले महाराज, सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज, इंगळे महाराज, रमेश गिरी महाराज, उद्धव महाराज, रामानंद गिरी महाराज, काशिकानंद महाराज, अरुण गिरी महाराज, भास्करराव गोंदकर, चंद्रकांत सांगळे, चंद्रभान महाराज चौधरी उपस्थित राहणार अाहेत. दरम्याान, या सोहळ्याचा इच्छुकांनी आवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नाव नोंदणीस अावश्यक कागदपत्रे
सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वधू-वरांची नावनोंदणी सुरू असून वधू-वरांचे शाळा सोडल्याचे दाखले, प्रत्येकी दोन पासपोर्ट साइजचे फोटो, रक्त चाचणी अहवाल, वधू-वरांचा पत्ता व संपर्क नंबर, त्यांच्या मामांचे नाव व पत्ता तसेच वय वर्षे २१ पूर्ण झाल्याचा दाखला देणे आवश्यक आहे.
येथे करावी नावनोंदणी
नाव नोंदणीसाठी साईबाबा संस्थानच्या रूम नं ५००, भक्त निवासासमोर हॉटेल भक्ती पार्क इन, संदीप डेरे (९८५०५०००८०), अनिल शेळके (९०९६१७४०५०), वाल्मीक बावचे (९८२३१४१७७४), शफिक शेख (९७६३२९८७१२) यांच्याकडे संपर्क साधावा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.