आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कैलास गिरवले यांच्या मृत्यूची स्वतंत्रपणे चौकशी करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - माजी नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या आहे. खुलेआम हत्या करण्याचा पोलिसांना परवाना नाही. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करून दोषी पोलिस अधीक्षकांसह अन्य अधिकाऱ्यांवर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करावा,अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. 


शासकीय विश्रामगृहावर काँग्रेसच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार भाऊसाहेब कांबळे, समन्वयक विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, माजी मंत्री विजय नवल पाटील आदी यावेळी उपस्थित होते. विखे म्हणाले, पोलिस प्रशासन दबावाखाली काम करत अाहे. हे दुर्दैव आहे. केडगाव येथील प्रकरणानंतर शिवसेनेचे तीन मंत्री नगरमध्ये येतात. मुंबईत रोज घटना घडतात, त्यावेळी हे मंत्री तेथे का जात नाही? असा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, माजी नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या आहे. खुलेआम हत्या करण्याचा पोलिसांना परवाना नाही. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करून दोषी पोलिस अधीक्षकांसह अन्य अधिकाऱ्यांवर ३०२ अन्वये गुन्हा दाखल करावा. केडगाव येथील हत्याकांड हे पक्षीय राजकारणातून झाले नाही. त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करावी, ठरावीक लाेकांवरच कारवाई होत आहे. घटनेतील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. देशाची वाटचाल पूर्णपणे अस्वस्थतेकडे चालली आहे. कठुआ प्रकरणावर देशाचे पंतप्रधान बोलत नाहीत. देशभर आक्रोश झाल्यानंतर पंतप्रधान या विषयावर बोलले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते की, पतंप्रधानांनी देशाची राजधानीच परदेशात घेऊन जावे. ते खरे आहे. देशात दलित, महिला यांच्यावरील अत्याचारात वाढ झाली आहे. व्यापारी, व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत. सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांच्या खिशात हात घालून त्यांना लुटण्याचे काम सरकारकडून होत आहे. शेतीमालाला दीडपट हमी भाव जाहीर केला. प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. राज्यात तूर खरेदी होऊ शकली नाही. शेतीमालाचे भाव पडले. कर्जमाफीनंतरही ६५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातील शेतकऱ्यांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. पंतप्रधानांचा परदेशात वेळ जातो. त्यांना आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना भेटण्यास वेळ नाही. हे सरकार घोषणा करणारे आहे. सरकारची कर्जमाफी योजना फसली आहे. काँग्रेसला काहीजण बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, विखे यांनी गिरवले यांच्या निवासस्थानी गिरवले कुटुंबियांचे सांत्वन केले. 
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची पत्रकार परिषदेत माहिती 


काँग्रेसचा २९ ला दिल्लीत जनआक्रोश 
देशाची वाटचाल अस्वस्थतेकडे सुरू आहे. देशात दररोज नवनवीन घटना घडत आहेत.या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने दिल्लीत २९ एप्रिलला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाची शुक्रवारी बैठक झाली, असे विखे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...