आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेेक, तोडफोड करणाऱ्यांवर अाता तडीपारीची टांगती तलवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर धुमसत असलेल्या नगर शहरातील सद्यपरिस्थितीबाबत 'दिव्य मराठी'च्या प्रतिनिधींनी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याशी गुरुवारी संवाद साधला. दुहेरी हत्याकांड, पोलिसांवर झालेली दगडफेक, पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड, नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू आदी विषयांवर शर्मा यांनी चर्चा केली. हत्याकांडाचा तपास प्रगतिपथावर असून लवकरच सर्व प्रश्नांचा उलगडा होणार आहे. त्याचबरोबर दगडफेक व तोडफोडप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. 


शर्मा म्हणाले, केडगाव दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. आरोपी रवी खोल्लम याच्याकडून अधिक माहिती मिळणार आहे. त्यामुळे या गुन्ह्याशी संबंधित सर्व प्रश्नांचा लवकरच उलगडा होणार आहे. हत्याकांडानंतर अनेक घटना घडल्या. त्यात पोलिसांनी आपली भूमिका योग्य पध्दतीने बजावली असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. 


पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड व पोलिसांवर झालेली दगडफेक याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल केले. दोन आमदारांसह ४४ जणांना अटक केली. तोडफोड व दगडफेक केली नसती, तर अशा पध्दतीने कारवाई करण्याची वेळच आली नसती. आम्ही कोणतीच कारवाई केली नसती, तर आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले असते. आरोपी कोणत्याही राजकीय पक्षांचे असोत, आम्ही नियमाप्रमाणे कारवाई करत आहोत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले अाहेत. त्यांच्या अटकेच्या कारवाईसाठी सीसीटीव्ही फुटेज व इतर चौकशी सुरू आहे. नगरसेवक गिरवले यांच्या मृत्यूमुळे अाम्ही दोन्ही पक्षांतील आरोपींची धरपकड काही दिवसांसाठी थांबवली आहे. मात्र, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा सर्व आरोपींचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासण्यात येणार आहे. ज्यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल अाहेत, अशा आरोपींच्या विरोधात तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले. गिरवले यांच्या मृत्यूबाबत सीआयडी तपास करत आहे. गिरवले यांना तीन वेळा न्यायालयासमोर हजर केले, तेव्हा त्यांनी न्यायालयाकडे मारहाण झाल्याचे अथवा प्रकृती अस्वास्थ्य असल्याबाबत कोणतीच तक्रार केली नसल्याचेही पोलिस अधीक्षक शर्मा यांनी सांगितले. 

 

आरोपी आले होते तयारीने 
केडगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत आहेत. परंतु अजूनही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत. याबाबत शर्मा यांना विचारले असता ते म्हणाले, तपास प्रगतिपथावर आहे. हत्याकांडात ज्यांची नावे समोर येतील, त्यांच्यावर कारवाई होईल. आरोपी खोल्लम व मृत संजय कोतकर यांचे फाेनवर भांडण झाले. कोतकर व ठुबे हे खोल्लम याला मारण्यासाठी येणार होते. याबाबत खोल्लम याचे कोणाशी बोलणे झाले, ते तपासात स्पष्ट होईल. मात्र, खोल्लम याला मारण्यासाठी कोतकर व ठुबे येणार असल्याने खोल्लमचा बचाव करण्यासाठी आरोपी गुंजाळ, गिऱ्हे, मोकळे हे तयारीनिशी आले होते, असे तपासात समोर आले असल्याचे शर्मा यांनी सांगितले. 
हल्ला झाल्याने कारवाई 
हत्याकांडातील फिर्यादीत अनेकांची नावे आहेत, 

बातम्या आणखी आहेत...