आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंदळ येथे आदिवासी तरूणाचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर -  लाकडापासून कोळसा पाडणाऱ्या विष्णू पवार (४०) या आदिवासी तरुणाचा केंदळ खुर्द येथे खून झाला. मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवत मारेकरी पसार झाले. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धोंडीराम आढाव यांच्या पडीक क्षेत्रात विष्णूचा मृतदेह आढळला. मंगळवारी दुपारी घटनेची माहिती ठेकेदार भाउराव राठोड (तिसगाव, ता. पाथर्डी) यांना समजली. पोलिस पाटील प्रल्हाद तारडे यांनी घटनास्थळी भेट दिली. ताडपत्रीच्या झोपडीत मृतदेह गुंडाळून ठेवण्यात आल्याने दुर्गंधी सुटली होती. विष्णूसह इतर १० ते १२ महिला-पुरुष लाकडी कोळसा तयार करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी तेथे आले होते. विष्णूबरोबर पत्नी व ५-६ वर्षांची मुलगी होती. हे सर्वजण लोणवळा येथील होते. भाऊराव राठोड (तिसगाव) यांनी कोळसा तयार करण्यासाठी त्यांना आणले होते. पोलिस पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहे. विष्णूची पत्नी, मुलगी व मेहुणाही पसार झाले आहेत. आमच्याच लोकांकडून घात होणार असल्याचे विष्णूने ठेकेदाराला सांगितले होते. घटना दोन-तीन दिवसांपूर्वी घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...