आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या प्रशासकीय कामात लोकप्रतिनिधींची ढवळाढवळ; बदल्यांसाठी आणला जातो दबाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिकेतील वर्ग दोन ते चारमधील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धोरण निश्चित नसले, तरी आयुक्तांना बदल्या करण्याचे अधिकार आहेत. अधिकारी, कर्मचारी हे पदाधिकारी, नगरसेवकांमार्फत प्रशासनावर दबाव आणून सतत बदल्या करण्यास भाग पाडतात. वेळोवेळी बदल्या करण्यात येत असल्याने प्रशासकीय कामात अडचणी येत असल्याचे पत्र काही महिन्यांपूर्वीच आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना काढले होते. त्यात एकाच विभागात किमान तीन वर्षे काम करण्याचा कालावधी निश्चित करून पात्र कर्मचाऱ्यांची यादी ३१ जानेवारीपर्यंत आस्थापना विभागाकडे पाठवण्याचे आदेशही दिले आहेत. 


महापालिकेची सध्याची अवस्था बिकट आहे. बिलांच्या मंजुरीसाठीच्या फायली प्रशासकीय यंत्रणांएेवजी उपठेकेदारच घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे घेऊन जातात. फायलींचा असा बेकायदेशीर प्रवास होणे, ही बाब गंभीर आहे. वर्षानुवर्षे एकाच विभागात एकाच टेबलला चिकटून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत, तर काही जण सोयीच्या बदल्या करून घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यातच आता पदाधिकारी नगरसेवक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी दबाव आणतात असा प्रकार समोर आला आहे. आयुक्तांनी जुलै २०१७ रोजी सर्व विभागप्रमुख, तसेच शाखा अभियंत्यांना पत्र काढले होते. या पत्रात देण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी हे पदाधिकारी, नगरसेवकांमार्फत प्रशासनावर दबाव आणून बदल्या करण्याबाबत प्रशासनास भाग पाडतात. वेळोवेळी बदल्या करण्यात आल्याने प्रशासनाच्या कामात अडचणी येत आहेत. 


श्रेणी दोन ते चारमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे अधिकार आयुक्तांना असून त्यापैकी श्रेणी चारच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे अधिकार अन्य अधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत. त्यानुसार बदल्या केल्या जात आहेत. बदल्या करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले नाही. 


मनपातील बदल्यांबाबतचे धोरण निश्चित करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार श्रेणी दोन ते चारमधील अधिकारी, कर्मचारी (एकाकी संवर्ग ज्या संवर्गात अन्य विभागात बदली करता येणार नाही, असे वगळून) कर्मचाऱ्यांना एका विभागात काम करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी राहील. 


श्रेणी तीनमधील कर्मचाऱ्यांचा एका विभागात काम करण्याचा कालावधी सहा वर्षे राहील, पण तीन वर्षांनंतर विभागांतर्गत कामकाजाचे विषय बदलण्यात यावेत. दोन तीन श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या एप्रिल मे महिन्यात करण्याचे म्हटले आहे. 


पूर्व पदावर कसे 
महापालिकेतीलकाही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या, पण ते पुन्हा काही महिने तसेच वर्षभरात पुन्हा पूर्वपदावर बदलून आल्याचे सर्वश्रूत आहे. काही अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधींचे लाडके आहेत. काही अधिकारी तर अपेक्षित ठिकाणी बदली मिळावी किंवा बदलीच होऊ नये, यासाठी ‘अर्थ’पूर्ण तयारी ठेवतात, अशीही जोरदार चर्चा आहे. 

 

अपवादात्मक परिस्थिती बदली 
रिक्तहोणाऱ्या जागा, तसेच वर्ग दोन ते चार मधील अधिकारी कर्मचाऱ्याबाबत गंभीर तक्रार आल्यास, ती तक्रार योग्य असल्याचे निदर्शनास आले, तर अपवादात्मक परिस्थितीत केंव्हाही बदली केली जाईल, असेही आदेशात म्हटल्यामुळे तक्रार असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊ शकतात. 


अशी राहील प्रक्रिया 
विभागप्रमुखांनीश्रेणी दोन ते तीनमधील बदलीपात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी ३१ जानेवारीपर्यंत आस्थापना विभागाकडे पाठवायची आहे. आस्थापना विभागाने याद्या, तसेच कर्मचाऱ्यांकडून आलेल्या अर्जांची छाननी करून एप्रिल मे अखेर आयुक्तांच्या मान्यतेने बदल्यांचे आदेश काढले जातील. 


चतूर्थश्रेणींची होते हेळसांड 
मनपातीलद्वितीय तृतीयश्रेणीतील अधिकारी कर्मचारी बदली होऊनही अथवा बदली करावी, यासाठी नेहमी आग्रही असतात. पण चतूर्थश्रेणी कर्मचारी मात्र, बदल्यांचा आग्रह धरत नाहीत. जरी धरला तरी त्यांचे म्हणणे फारसे विचारात घेतले जात नाही. उलट वाटेल तेव्हा वाटेल तेथे मनमानी बदल्या होतात, असे काहींनी खासगीत बोलताना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...