आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्यम वर्मा खून खटला; आरोपी ढवळेला जन्मठेप; परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगरमधील पाइपलाइन रस्ता परिसरात वास्तव्यास असलेले जेऊर येथे सोन्या-चांदीचे दुकान चालवणारे सत्यम शांतीलाल वर्मा यांच्या खूनप्रकरणी आरोपी स्वप्नील रमेश ढवळे (वांबोरी, ता. राहुरी, जि. नगर) याला जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 


सत्यम वर्मा हे मे २०१५ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या जेऊर येथील दुकानावर गेले. मात्र, सायंकाळी ते पुन्हा घरी आले नाहीत. घरच्यांनी वारंवार फोन करूनही त्यांचा फोन लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यम यांचे भाऊ सुंदरम शांतीलाल वर्मा हे सत्यम यांना शोधण्यासाठी जेऊरला निघाले. मात्र, रस्त्यातच हॉटेल ड्रिमसमोर सत्यम यांची दुचाकी त्यांना दिसली. ही सर्व माहिती संुदरम यांनी एमआयडीसी पोलिसांना कळवली. पोलिसांना शेंडी शिवारातील दावलगल शिवारात सत्यम यांचा मृतदेह आढळून आला. 


सत्यम यांच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. त्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या. त्यानंतर संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपी मृताचे फोनवरील संभाषण देखील पोलिसांनी तपासले. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. अर्जुन पवार यांनी काम पाहिले. या खटल्यात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील पवार यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी ढवळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

बातम्या आणखी आहेत...