आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळतीमुळे घोरदरा तलाव अर्धा रिकामा; लाखो लिटर पाणी वाया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करंजी- घोरदरा तळाव गळतीमुळे अर्धाअधिक रिकामा झाला. लाखो लिटर पाणी वाया गेले. पाणी वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 


घाटाच्या पायथ्याशी असलेल्या या पाझर तलावाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. १९७२ मध्ये तयार करण्यात आलेल्या या तलावाखाली गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. त्यांनाही पाणी रहात नाही. त्यामुळे संपूर्ण गावाला पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तलावाची गळती थांबली, तर शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटेल. तलाव दुरूस्तीचे अनेकांनी प्रयत्न केले, पण यश आले नाही. 

 

शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रफिक शेख म्हणाले, जि. प. सदस्य अनिल कराळे यांच्या माध्यमातून दुरुस्तीसाठी ५५ लाख मंजूर झाले आहे. पहिले टेंडर बाद झाले. आता नव्याने टेंडर निघाले असून तलावातील पाणी कमी झाल्याबरोबर कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...