आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीलेश लंकेंची शिवसेनेतून हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- तालुका शिवसेनेत गेल्या काही दिवसापासून आमदार विजय औटी व माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके यांच्यात गटबाजी सुरू होती. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार लंके यांची िशवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी मुंबईतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे दिली आहे. लंके यांना पक्षातून हकालपट्टी केल्याच्या वृत्ताची शनिवारी दिवसभर तालुक्यात चर्चा सुरू होती. 


आमदार औटी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासमोर लंके यांनी शक्तिप्रदर्शन केले. ते आमदार औटी यांच्या पथ्यावर पडल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमानंतर गाडीच्या काचा फुटल्या, याला औटी समर्थकांनी लंकेंना जबाबदार धरले होते. त्यानंतर काही दिवसांनी लंके यांना तालुकाप्रमुख या पदावरून हटवण्यात आले होते. तेव्हाच लंके यांना पदावरूनच नाही, तर पक्षातूनच हकालपट्टी करावी, अशी मागणी आमदार औटी यांनी केली होती. त्यानुसार शनिवारी मुंबई येथील एका वृत्तपत्रात लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची बातमी प्रकािशत झाली. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका लंके यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या पुढे तालुक्याचे राजकीय समीकरण वेगवान होणार आहे. राजकीय पक्षात मोठी उलथापालथ होणार आहे. आता लंके कोणत्या पक्षात जाणार किंवा स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणार का? लंके यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे, तसेच शिवसेनेतील लंके समर्थक काय भूमिका घेतात ते महत्त्वाचे ठरणार आहे. 


दरम्यान, नीलेश लंके यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे ते अागामी विधानसभा िनवडणुकीत आमदार औटी यांच्यासाठी अडचण निर्माण करू शकतात. 


शिवसेना माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहणार 
मी सच्चा शिवसैनिक आहे. यापुढे िशवसेनाप्रमुखांचा सैनिक म्हणूनच काम करत राहील. शिवसेनाप्रमुख हेच माझा पक्ष आहेत. ते माझ्या हृदयात आहेत. पक्षाच्या क्षणिक सुखासाठी हे चालले आहे. शिवसेना माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहणार आहे. जे बाळासाहेबांचे सैनिक आहेत ते यापूर्वीही माझ्याबरोबर होते, यापुढेही राहतील. कुरघोड्यांचे राजकारण लोकप्रतिनिधी करत आहे. तालुक्यातील जनता त्याचे उत्तर येणाऱ्या काळात देईल, असे लंके म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...