आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार पटोले यांचा राजीनामा ही सरकारला चपराक; राधाकृष्ण विखे यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- सरकारच्या धोरणावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. आता भाजपचे लोकप्रतिनिधीही सरकारवर अविश्वास दाखवू लागले. भाजप खासदार नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा हा पक्षातीलच असंतोषाची प्रतिक्रिया असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. 


लोणी येथे पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, पटोले सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात जाहीर भूमिका घेत होते, तरीही सरकारला सोयरसूतक वाटले नाही. आता तर त्यांना पक्ष सोडावा लागला. ही पक्षाला मोठी चपराक आहे. पटोले काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असतील, तर त्यांचे आम्ही स्वागतच करू. आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला महत्त्व देत नसल्याचे विखे यांनी सांगितले. शिवसेना, भाजपची भूमिका वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या तुझे माझे ब्रेकअप या मालिकेसारखे आहे. सत्तेतून बाहेर पडण्यासाठी राजीनामे देण्याचे नाटक करणाऱ्या शिवसेनेला सत्ता सोडवत नाही हे दुर्दैव आहे, असे विखे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...