आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार भ्रष्ट, साखर कारखानदार पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर; राजू शेट्टी यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- जिल्ह्यातील साखर कारखानदार पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. भ्रष्ट सरकार साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने शेतकऱ्यांना ऊस दरासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने उसाला केवळ 2200 ते 2300 रूपये भाव देतात याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

 

संगमनेर येेथे स्वातंत्र्यसैनिक साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीदिनी आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सरकार व सहकारी साखर कारखानदारांवर जोरदार टीका केली. खासदार शेट्टी म्हणाले, साखर कारखानदारांना माज चढला आहे. शेतकऱ्यांनी हाती उसाचा बोडखा घेतल्याशिवाय हा माज उतरणार नाही.

 

चळवळीत राज्यात अग्रेसर असणारा अहमदनगर जिल्हा मागे पडल्याने येथे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अच्छे दिनाचे गाजर दाखवून सर्वांना फसवले आहे. उस वगळता कोणत्याही शेतमालाला हमी भाव नाही. दुसऱ्या देशातून शेतमाल आयात करायचा, निर्यातीच्या बाबतीतही अडथळे निर्माण करायचे. शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानातून कांदा आयात करायचा असे करत सरकार शेतकऱ्यांची जिरवायचा प्रयत्न करत आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.  लोकसभेत देशातून 543 खासदार निवडुन जातात. मात्र, देशात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल कुणीही संसदेत प्रश्न मांडत नाही.

 

बातम्या आणखी आहेत...