आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलावाची दुरुस्ती लवकरच मार्गी लावू : आमदार राहुल जगताप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर तालुक्यातील दशमी गव्हाण येथे सोमवारी आमदार राहुल जगताप यांनी भेट देऊन गावातील मारुती मंदिर सभामंडप, मुस्लिम कब्रस्तान वॉल कंपाउंंड, दशमी गव्हाण ते उक्कडगाव रस्ता, तसेच दशमी गव्हाण येथील जामखेड रोडलगत असलेल्या तलावाची दुरुस्ती (गळती बंद करणे) इत्यादी कामे लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आमदार जगताप यांनी ग्रामस्थांना दिले. 


कुकडी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव थोरात, नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, चिचोंडीचे उपसरपंच शरद पवार, मार्केट कमेटी संचालक बाजीराव हजारे, मुख्याध्यापक प्रकाश ठोंबरे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक अध्यक्ष पापामिया पटेल, दशमी गव्हाणचे सरपंच बाबासाहेब काळे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस रामेश्वर काळे, श्याम कांबळे, रिजवान शेख, मार्केट कमेटी संचालक उद्धव कांबळे, बाबा शेख, सुकदेव कोकाटे, गजाजन कांबळे, विजय काळे, योगेश काळे, विलास खांदवे, जयसिंग काळे, अन्सार शेख आदी यावेळी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...