आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेच्या सभेत छिंदमच्या निषेधाचा ठराव; शिवसेना-भाजप सदस्यांत खडाजंगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमचा निषेध आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुरूवारी करण्यात आला. आमदार-खासदारांनी निषेध न केल्याचा आरोप शिवसेनेने केल्यानंतर भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी आक्षेप घेतला. या मुद्द्यावरून काही काळ गोंधळ निर्माण झाला. 


जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष शालिनी विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, उमेश परहर, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे आदी उपस्थित होते. 


सभेला सुरवात झाल्यानंतर छिंदमच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. त्यानंतर सभागृहात काळ्या फिती लावून आलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी छिंदमसह भाजप नेत्यांवर टीकेची झोड उठवली. आमदार, खासदार, पालकमंत्री, पंतप्रधान यांच्यावर बोलण्यावरुन भाजप व शिवसेना सदस्यांत जोरदार खडाजंगी झाला. छिंदमने चुकीचे काम केले, पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे, असे सांगून शिवसेनेने छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केली. त्याला भाजपचे वाकचौरे यांनी अनुमोदन दिले. मात्र, भाजप नेत्यांवर बोलण्याला त्यांनी आक्षेप घेतला. ही विशेष सभा जिल्ह्याच्या विकासावर बोलण्यासाठी नाही, तर भाजपला विरोध करण्यासाठी आहे. आम्हाला सभेत विकासकामांवरही बोलू दिले जात नसल्याचे वाकचौरे म्हणाले. त्यामुळे अध्यक्ष संतापल्या. 


समाजकल्याण विभागातर्फे ८८ लाख १९ हजार रुपये खर्चून जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात अपंग पुर्नवसन केंद्र व थेरपी सेंटर करण्याला सदस्यांनी विरोध केला. केंद्र कोठेही स्थापन करा, पण जिल्हा रुग्णालयात नको असे त्यांनी सांगितले. अंगणवाडीतील शालेय पोषण आहार निकृष्ट आहे. तो खाण्याऐवजी फेकून दिला जातो. त्यामुळे आहाराचे वाटप बंद करावे, असा ठराव करण्यात आला. दुर्घटना घडली, तर त्याला ठेकेदार जबाबदार असेल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी माने म्हणाले. 


ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विविध कामे केली जातात. यंदा चार कोटी ३४ लाख ३७ हजार मनुष्यदिन व १ लाख ८८ हजार ३३३ कामांचा एक हजार ३१३ कोटी ६९ लाखांचा आराखडा तयार केला आहे. सदस्य सुनील गडाख, राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, हर्षदा काकडे, शरद नवले, अनिल कराळे, रामदास भोर, संदेश कार्ले, सीताराम राऊत आदींनी आक्षेप घेतला. अधिकाऱ्यांनी हा आराखडा तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. सदस्यांचे म्हणणे एेकून घ्या, त्यांच्या हरकती नोंदवा, असे आदेश विखे यांनी दिले. 


१३०० कोटींचा आराखडा नाकारला 
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी १ हजार ३०० कोटींच्या वार्षिक आराखड्याला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने गुरूवारी मंजुरी नाकारली. आता १५ मार्चला होणाऱ्या अर्थसंकल्पीय सभेत त्याला मंजुरी दिली जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...