आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडांमुळे बसमधील विद्यार्थी बचावले, सकाळी माळवाडगाव येथे अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - अशोक इंग्लिश मीडियम स्कूलच्या बसला मंगळवारी सकाळी माळवाडगाव येथे अपघात झाला. सुदैवाने बस झाडांमध्ये अडकल्याने अनर्थ टळला. ३० विद्यार्थी सुखरूप राहिल्याने पालकांनी निःश्वास सोडला. बस प्रशिक्षित चालकाऐवजी शिकाऊच्या हातात देण्यात आली असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे.


या शाळेमध्ये भामाठाण, खानापूर, माळवाडगावचे विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थी घेऊन बस (एमएच १७ एजी ४९४८) मुठेवाडगावकडे निघाली होती. वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरून खाली उतरली. सुदैवाने ती झाडांमध्ये अडकली. ग्रामस्थ पालकांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने कोणीही विद्यार्थी जखमी झाला नाही. पालकांच्या माराच्या भीतीने चालक सतीश कुडे भालेराव पसार झाले. नंतर प्राचार्य रईस शेख सहकारी, अशोक कारखान्याचे सुरक्षा अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पालकांनी त्यांना जाब विचारला.

बातम्या आणखी आहेत...