आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजीवनी अभियांत्रिकीच्या ७ विद्यार्थ्यांची पोराईट इंडियात निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव- जपानमध्ये मुख्यालय असलेल्या पुण्यातील पोराईट इंडिया या अॉटोमोबाईल क्षेत्रातील विविध मशिनरींचे अतिसूक्ष्म भाग बनवणाऱ्या कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा, तर संजीवनी पाॅलिटेक्निकच्या एका विद्यार्थ्याची नोकरीसाठी निवड केली. प्रशिक्षण काळात इतर सुविधांसह पदवीधारक अभियंत्यांना २.५ लाख व पदविकाधारकास २ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले, अशी माहिती संजीवनी ग्रूप आॅफ इन्स्टिट्यूटस््चे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली. 


निवड झालेल्या नेहा गायकवाड, अमोल भोरकडे, नीदा शेख, प्रशांत पाटील, शुभांगी जाधव, वैभव जाधव आणि संजीवनी पाॅलिटेक्निकचा रेवणनाथ शेळके यांचा सत्कार कोल्हे यांनी केला. यावेळी संजीवनी अभियांत्रिकीचे प्राचार्य डाॅ. डी. एन. क्यातनवार, उपप्राचार्य डाॅ. ए. जी. ठाकूर, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट आॅफिसर डाॅ. एस. एस. इंगळे व संजय गवळी उपस्थित होते. 


कोल्हे यांनी सांगितले, संजीवनीच्या सर्व व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये अभ्यासपूर्वक पॅटर्नची निर्मिती करण्यात आली असून या अंतर्गत विभागनिहाय तज्ज्ञ प्राध्यापकांची नेमणूक केली अाहे. हे प्राध्यापक नामांकित कंपन्यांच्या मानव संशोधन व विकास विभागाच्या संपर्कात राहून आगामी काळात कोणत्या तंत्रज्ञानाची गरज असणार आहे, याची माहिती घेतात. त्यानुसार शाखानिहाय ते तंत्रज्ञान स्वतः अवगत करतात आणि नियमित अभ्यासक्रमाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यामुळे संजीवनीचे विद्यार्थी कंपन्यांच्या कसोट्या सहज पार करतात. कंपन्यांना नवोदित अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. परंतु संजीवनीच्या या अनोख्या पॅटर्नमुळे कंपन्यांचा भार कमी होत आहे आणि त्यांना लागणारे योग्य मनुष्यबळ उपलब्ध होत असल्यामुळे संजीवनीच्या विद्यार्थ्यांना कंपन्या प्रथम पसंती देतात. आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व संजीवनीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


महाविद्यालयातर्फे सत्कार 
संजीवनी ग्रूप आॅफ इन्स्टिट्यूटस््चे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी संजीवनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची पोराईट इंडिया या कंपनीने निवड केल्याबद्दल सत्कार केला. यावेळी डाॅ. क्यातनवार, डाॅ. ठाकूर, डाॅ. इंगळे व गवळी आदी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...