आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी-सुरत विमानसेवा 15 फेब्रुवारीपासून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - शिर्डीहून मुंबई व हैदराबादपाठाेपाठ अाता सुरतलाही विमानसेवा सुरू हाेत अाहे. १५ फेब्रुवारी राेजी व्हेंचुरा एअर कनेक्ट ही कंपनी शिर्डीहून ९ आसनी विमानसेवा सुरू करत आहे. रविवारखेरीज अाठवड्यात सहाही दिवस ही विमानसेवा सुरू असेल. ३५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत प्रवासभाडे असेल.

 

सध्या शिर्डीतून मुंबई व हैदराबादसाठी एअर इंडियाची विमानसेवा सुरू आहे. या दोन्हीही मार्गांवर उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने खासगी कंपन्याही शिर्डीला हवाईसेवा देण्यासाठी सरसावल्या आहेेेत. ९ आसनी चार्टर विमानाने शिर्डी ते सुरत सेवा सुरू हाेत अाहे. सुरतवरून सकाळी १०.३० वाजता हे विमान निघून ११.३० ला शिर्डीला पोहोचेल. दुपारी दोनला परतीच्या प्रवासाला निघून ३ वाजता सुरतला पोहोचणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...