आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर- केडगाव येथील दोन शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी नगर शहरात दाखल होत असून शिवसेनेकडून या दौऱ्याची तयारी करण्यात आली आहे.
मनपाच्या केडगावातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर ७ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता शिवसेनेचे उपप्रमुख संजय कोतकर व शिवसेनेचे वसंत ठुबे या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद नगर शहरासह जिल्हाभरात उमटले होते. शिवसेनेकडून रास्ता रोको, दगडफेक केल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बुधवारी (२५ एप्रिल) नगर शहरात दाखल होत आहेत.
मुंबईहून सकाळी अकरा वाजता हेलिकॉप्टरने ते नगरकडे रवाना होणार आहेत. अकरा वाजता त्यांचे पोलिस परेड मैदानावर आगमन होईल. शहरात दाखल झाल्यानंतर ते केडगाव येथे जाऊन कोतकर व ठुबे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. नगरच्या दौऱ्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.