आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसारा येथे जाणारी गाडी पोहचली भंडारदऱ्यात, बसचालकामुळे १५ विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारदरा- अकोले आगारातील वाहन चालक व वाहकाने कसारा येथे जाणारी गाडी भंडारदरा येथे न आणल्यामुळे भंडारदरा येथे तिच्या प्रतीक्षेत असलेल्या १५ आदिवासी विद्यार्थ्यांची कुचंबणा होऊन त्यांना ठाणे येथे महानगर पालिकेच्या परीक्षेला बसता आले नाही.या बाबत या विद्यार्थ्यांनी थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. 


हा प्रकार सोमवारी सकाळी घडला. अकोले आगाराची ही बस (क्र. एमएच १४ बीटी ४५८४) भंडारदरा येथे आलीच नाही. तिची शेंडी येथे येण्याची वेळ पहाटे पाचच्या सुमारास असते. ती मिळाली असती तरच विद्यार्थी वेळेत पोहोचले असते. ती वाडीमार्गे चालकाने थेट नेली. त्यामुळे संबंधित १५ विद्यार्थ्यांची नोकरीसाठीची परीक्षा चुकली. या प्रकाराची चौकशी करून संबंधित बेफिकिर चालक वाहकास कठोर शिक्षा करावी, अशी मागणी योगेश तारगे, संदीप खाडे , गणेश मुकण, चंदन पटेकर या विद्यार्थ्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. या विद्यार्थ्यांच्या नुकसानाची भरपाई अकोले आगाराने करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


या भागात आधीच एसटीची सेवा अपूर्ण आहे. जी आहे, तीही अनेकदा चालक व वाहकांच्या अशा बेपर्वा वागणुकीमुळे विस्कळित असते. यात परिवहन मंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी परिसरातून मागणी होत आहे. या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणी अकोले आगाराशी संपर्क साधला असता, कोणीही काहीही बोलण्यास नकार दिला. 

 

बातम्या आणखी आहेत...