आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अमृत'ची 124 कोटींची निविदा 'स्थायी'त दहा मिनिटांत विरोध धुडकावून मंजूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत शहरात भुयारी गटार योजनेसाठी स्थायी समितीने सुमारे पावणेदोन टक्के वाढीव दराच्या निविदेला गुरुवारी मंजुरी दिली. विशेष म्हणजे कोणतीही साधक-बाधक चर्चा न करता अवघ्या दहा मिनिटांत ही सभा गुंडाळण्यात आली. वाढीव दराच्या निविदेमुळे महापालिकेवर सुमारे ३ कोटी ३१ लाखांचा बोजा पडणार आहे. तीन सदस्यांनी निविदा मंजुरीस विरोध दर्शवला, परंतु तो डावलण्यात आला. 


महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी सभापती सुवर्णा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अमृत योजनेंतर्गत शहरातील भुयारी गटारीचा विषय मार्गी लागणार आहे. शहरातील ओढे व नाल्यातील दूषित पाणी सीना नदीत सोडण्याऐवजी ते पाइपलाइनद्वारे फराहबक्ष महालाजवळ नेण्यात येणार आहे. तेथे पाण्यावर प्रक्रिया करून ते शेती व उद्योगासाठी वापरता येईल. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने महापालिकेला १३१ कोटी मंजूर केले आहेत. या रकमेपैकी सुमारे १२४ कोटी ३८ लाखांच्या विविध कामांची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली होती. अंतिम मंजुरीसाठी हा विषय गुरुवारी सभेत सादर करण्यात आला. नंदुरबार येथील ड्रीम कन्स्ट्रक्शनने ही निविदा तीन टक्के वाढीव दराने भरली होती. तथापि, प्रकल्प समन्वयक असलेल्या जीवन प्राधिकरणने पुन्हा आराखडा काढून १२५ कोटी ९१ लाखांचा केला. 


सभेत सुरुवातीलाच बोराटे यांनी आक्षेप घेत नगरसचिवांना सभा बोलावण्याचा अधिकार असला, तरी सभा घेण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट केले. आयुक्त असल्याशिवाय सभा सुरू करू नये, अशी सूचना त्यांनी मांडली. विषय गंभीर आहेत, चुकीचे निर्णय झाले, तर आम्ही जेलमध्ये जाणार नाही असे स्पष्ट करत त्यांनी हरकत घेतली. सभापतींनी या हरकतीकडे दुर्लक्ष करत इतिवृत्त वाचण्याचा आदेश दिला. मुदस्सर शेख यांनी एक वर्षाचे इतिवृत्त शिल्लक का राहिले, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर तडवी यांनी सभापतींकडे फाईल पाठवली जाते, त्यात ज्या विषयावर टीक केली जाते, ते विषय पूर्ण केले जातात, असे सांगितले. त्याचवेळी नगरसेवकांनी भुयारी गटारीचा विषय विकासासाठी महत्त्वाचा असल्याने मंजूर करण्याची सूचना मांडली. त्यानंतर सर्व िवषयांना अवघ्या दहा मिनिटांत मंजुरी देण्यात आली. 

 

तीन सदस्यांचा विरोध 
या सबेसाठी सोळा सदस्यांपैकी बारा सदस्य उपस्थित होते. त्यात ख्वाजाजी कुरेशी, कलावती शेळके, योगीराज गाडे, समद खान, हे चार जण गैरहजर होते. वाढीव दराच्या निवेदमुळे महापालिकेवर सुमारे साडेचार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने विरोधीपक्षनेते बाळासाहेब बोराटे, मुदस्सर शेख, संजय लोंढे यांनी विरोध केला. 

बातम्या आणखी आहेत...