आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर-पुणे महामार्गावर स्कॉर्पिओ-कंटेनरचा अपघात, एका महिलेसह दोन जण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अहमदनगर-पुणे मार्गावर चास शिवारात झालेल्या अपघातात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे कंटेनवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीवर हे कंटेनर आदळले. शनिवारी रात्री हा अपघात झाला.


याविषयी सविस्तर वृत्त असे की, अपघातग्रस्त कंटेनर पुण्याकडून नगरच्या दिशेने येत होता. तर स्कॉर्पिओ गाडी नगरहून पुण्याकडे निघाली होती. दरम्यान कंटेनर चालकाचा गाडीवरील ताब्या सुटल्याने कंटेनर दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेने येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीवर जाऊन पलटी झाला. या अपघातात सिंधूबाई गायकवाड आणि कंटेनर क्लिनरलह एकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पुणे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतून विस्कळीत झाली होती.

बातम्या आणखी आहेत...