आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरजवळ अपघातात तीन व्यावसायिक जागीच ठार; कार झाली चक्काचूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळकी- नगर-सोलापूर महामार्गावर रुईछत्तीशीजवळ शनिवारी रात्री अकराच्या सुमारास मालमोटार कारच्या अपघातात निंबळक (ता. नगर) येथील तीन व्यावसायिक जागीच ठार झाले. या अपघातात कार चक्काचूर झाली. या भयंकर दुर्घटनेने निंबळक गावावर शोककळा पसरली आहे. 


भैरवनाथ गायकवाड (४०), आत्माराम खरमाळे (२८)आणि जालिंदर भिल्लारे (३८, सर्व निंबळक) अशी मृतांची नावे आहेत. महेश काळसे हा तरुण जखमी झाला. मालमोटारीने धडक बसल्याने कारचा चक्काचूर झाला. कारमधील तिघे जागीच ठार झाले. दोघांचे हॉटेल, तर एकाचा मोटार वायडिंगचा व्यवसाय होता. 

बातम्या आणखी आहेत...