आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकलीने मृतदेहांसोबत काढले 40 तास; वडिलांनी आईचा खून करुन केली आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खूनाच्या वेळी ही 3 वर्षाची चिमुकली सर्वकाही पाहत होती नंतर तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. - Divya Marathi
खूनाच्या वेळी ही 3 वर्षाची चिमुकली सर्वकाही पाहत होती नंतर तिच्या वडिलांनी आत्महत्या केली.

अहमदनगर- वडिलांनी आईचा खून करुन आत्महत्या केल्यानंतर एक तीन वर्षांची चिमुकली 40 तास एकटीच त्यांच्या मृतदेहासोबत बसल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे घडली आहे. हा सगळा प्रकार तीन वर्षांच्या चिमुरडीसमोरच घडला. मात्र, हे काय सुरू आहे, याची जाणीव तिला नव्हती. भूक लागल्यावर घरात पडलेले काही पदार्थ तिने खाल्ले. एकटेपणा वाटू लागल्यावर ती रडत होती. मात्र, तिचा आवाज कोणालाच ऐकू जात नव्हता. तब्बल चाळीस तास तिने मृतदेहाजवळ बसून काढले. शेवटी आजोबा आल्यावर तिची सुटका झाली.

 

असा झाला दोघांचा मृत्यू?

अकोलेत राहणारा टपरी चालक प्रकाश निवृत्ती बंदावणे (वय 33) यांनी रोजच्या भांडणाला कंटाळून पत्नी चित्रा हिचा दोरीने आवळून खून केला आणि नंतर आत्महत्या केली. त्यावेळी त्यांची तीन वर्षांची मुलगी तनिष्का घरात होती. बंदावणे याने घराच्या पुढील दाराला बाहेरून कुलूप लावल्याने कोणालाही संशय आला नाही. शेवटी मुलगी फोन उचलत नाही, हे पाहून चित्राचे वडील बाबू रजपूत (रा. वडगावपान) अकोलेला आले आणि नंतर हा प्रकार उघडकीस आला. आई-वडिल प्रतिसाद देत नसल्याने चिमुकलीने मोबाईल उचलून तो लावला होता. तो तिच्या आजोबांना लागला होता. पण ती काहीच न बोलता रडत होती. त्यानंतर आजोबांनी फोन लावल्यावर तो कुणीच न उचलल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

 

पोलिसांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा आतमधील दृष्य पाहून सर्वजण अवाक झाले. तनिष्काने घरात पडलेली बोरे आणि अन्य काही पदार्थ खाल्याने ती चाळीस तास तग धरून राहिली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. प्रकाश पूर्वी एका हॉटेलमध्ये काम करीत होता. अलीकडे तो एक टपरी चालवित होता.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...