आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या वादातून रिव्हॉल्वर कपाळावर ठेवत जीवे मारण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जुन्या भांडणाच्या वादातून एकास आठ ते नऊ जणांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना अमरधाम रस्त्यावर रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जावेद कासम शेख (३९, बिलाल पार्क, आलमगीर, भिंगार) हे मुजरी करतात. रविवारी रात्री ते दुचाकीने कांदा मार्केटकडे जात होते. 


अमरधाम रस्त्यावर आठ- नऊ जणांनी मारहाण केली. एकाने जावेद यांच्यावर तलवारीने वार केला. तर एकाने हातातील रिव्हॉल्वर कपाळावर ठेवत जावेद यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गोवश शेख, मतीन शेख, इम्रान शेख, जरीफ शेख, अंकुश भोरे, साजीद शेख उर्फ बब्बू फिटर (सर्व गोकूळवाळी, मारुती मंदिरासमोर, सर्जेपुरा), हबीब पत्रावाला (बेलदार गल्ली, नगर) सरदार पठाण (सुपा, ता. पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...