आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'निळवंडे'चे कालवे सुरु करण्याचे प्रयत्न करू; विरोधी पक्षनेते विखे यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून निळवंडे धरणाची कालवे सुरु करण्याचे प्रयत्न आहे. अकोलेतील पहिल्या २२ किलोमीटर अंतरातील सुरु न झालेल्या कामासंदर्भात ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्याशी व्यक्तिगत चर्चा करू. कोपरगावसाठी निळवंडेतील पाण्यात भागीदारी न करता दारणातून पाणी देण्याचा प्रस्ताव मान्य करायला हवे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले. 


विखे शनिवारी तळेगावमध्ये आले होते, त्यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विखे समर्थक कार्यकर्त्यांनी निळवंडे धरणाचे कालवे, कोपरगावला पाइपलाइनद्वारे पाणी आणि तळेगाव पाणी पुरवठ्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. कोपरगावला निळवंडेचे पाणी दिले जाऊ नये यासंदर्भात विखे लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली. निमोणचे सरपंच संदीप देशमुख, नामदेव दिघे, प्रकाश दिघे, अशोक इल्हे, गणपत दिघे, रामनाथ दिघे, गणीभाई शेख, डॉ. आर. पी. दिघे, किशोर नावंदर आदी उपस्थित होते. 


विखे म्हणाले, कोपरगावला निळवंडेतून पाणी देण्याचा प्रस्ताव नव्याने पुढे आला आहे. निळवंडेतून कोपरगावसाठी पाणी देण्यास तळेगावप्रमाणेच डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावातून आक्षेप आहे. वास्तविक कोपरगाव शहराला दारणा धरणातील पाणी यापुर्वीच आरक्षित आहे. दारणा धरणावरिल पाइपलाइन योजनेसाठी पूर्वी निधीदेखील मंजूर झाला होता, पण ती योजना कार्यान्वीत झाली नाही. यासंदर्भात राज्य सरकारकडे आपण काही सूचना केल्याचे ते म्हणाले. निळवंडेतून संगमनेरला आलेली पाईपलाईन पुढे तळेगावपर्यत जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून जोडल्यास अतिरिक्त खर्च वाचून काही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. अकोलेतून बंदिस्त पाइपलाइनद्वारे कालवे करण्याचा मधुकर पिचड यांचा आग्रह आहे. परंतु धरणाच्या मुखाशी पाइपलाइन टाकता येत नाही, यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करु. घुलेवाडी, गुंजाळवाडी येथे आरक्षित झालेल्या जमिनीवर कालव्यांची कामे तातडीने सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...