आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाखाचे गंठण लांबवणारे अशोकनगरचे दोघे गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेच्या गळ्यातील गंठण चोरून धूमस्टाइल मोटरसायकलवर फरार झालेले दोन चोरटे सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. - Divya Marathi
महिलेच्या गळ्यातील गंठण चोरून धूमस्टाइल मोटरसायकलवर फरार झालेले दोन चोरटे सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.

राहुरी शहर- महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण ओरबाडून नेणाऱ्या अशोकनगरच्या दोघा भामट्यांना राहुरीच्या पोलिसांनी सोमवारी पहाटे गजाआड केले. या दोघांच्या शोधार्थ राहुरी पोलिसांनी मकरसंक्रांतीची रात्र जागून काढली. 


मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरातील मंदिरात पूजेचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी घरी जात असलेल्या सुरेखा खळेकर यांच्या गळ्यातील ५ तोळे सोन्याचे गंठण पळवून नेण्याची घटना नगर-मनमाड राज्यमार्गावरील त्रिदेव वसाहतीजवळ घडली होती. घटनेची खबर मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी नगर-मनमाड राज्यमार्गावरील राहुरी ते राहुरी फॅक्टरी परिसरातील फुटेज ताब्यात घेतले असता. धूमस्टाईल मोटरसायकलवर जाणारे दोन भामटे एका हाॅटेलच्या फुटेजमध्ये कैद झाले. मोटारसायकलवरील दोघांची छबी पाहून राहुरी पोलिसांनी काल रात्रीपासून तपासाची सूत्रे हलवली. सोमवारी पहाटे ३ वाजता अशोकनगर (ता. श्रीरामपूर) येथील विनोद ऊर्फ खंज्या विजय चव्हाण (२२), अनुप गोंडाजी चव्हाण (३०) या दोघा चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांच्या अड्ड्याभोवती असलेली ७ फूट उंचीच्या वाॅलकंपाउंडवरून उड्या मारून जिवाची कोम्बिंग ऑपरेशनचा मार्ग अवलंबवला. गजाआड केलेले दोघे रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून राहुरीसह जिल्ह्यातील काही गुन्हे उघड होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली. गुन्हेगारांना जेरबंद करणाऱ्या पोलिस पथकात सहायक उपाधीक्षक अर्जुन कोरडे, अनिल गायकवाड, पोलिस नाईक गुलाब मोरे, महेश भंवर, हर्षवर्धन बहिर, आय्युब शेख, राठोड, पवार, जाधव, आव्हाड, बहिरनाथ अडागळे यांचा समावेश होता.