आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाराला लुटणारे दोघे परराज्यांतून ताब्यात; नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची तिघांवर कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सोनाराला लुटत १५ लाख २० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवणाऱ्या दोघांना मध्यप्रदेश व गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले. एकास मुंबईत अटक करण्यात आली. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून अन्य पाच आरोपींची नावेदेखील सांगितली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या विरोधात नगर तालुका व बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 


किरण गाेवर्धन निकम (२१), अविनाश बाळासाहेब आरवे (२२) व अक्षय त्रिंबक घोडके (२०, तिघे रा. घोसपुरी, ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नगर तालुका व बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनारास लुटणारे तिघे मध्यप्रदेश व गुजरात राज्यात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पवार यांना मिळाली. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व अितरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांनी तत्काळ मध्यप्रदेश व गुजरातला पथके रवाना केली. मध्यप्रदेश येथील ओंकारेश्वर व गुजरातमधील सुरत येथे आरोपींचा शोध घेण्यात आला. परंतु आरोपी तेथून फरार झाले होते. पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी अंकलेश्वर येथून दोघांना ताब्यात घेतले, तर एकास मुंबईत अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून इतर पाच आरोपींची नावेदेखील सांगितली आहेत. बाळासाहेब पांडुरंग घोडके, सोनू कारले, खवंदळ्या, चंप्या गांगुर्डे, दत्ता घोडके अशी इतर आरोपींची नावे आहेत. 


ताब्यात घेतलेल्या तिघांना पुढील तपासासाठी बेलवंडी व नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहायक निरीक्षक कैलास देशमाने, शरद गोर्डे, उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, सुधीर पाटील, श्रीधर गुट्टे, हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, उमेश खेडकर, मल्लिकार्जुन बनकर, दत्ता हिंगडे, रवींद्र कर्डिले, योगेश सातपुते, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, विजय ठोंबरे, विजयकुमार वेठेकर, दिगंबर कारखेले, मनाेज गोसावी, राहुल हुसळे, सचिन अडबल आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

बातम्या आणखी आहेत...