आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सो‍शल मीडियाचा वापर जागरूकतेने करा; पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे यांचा सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायबर गुन्हे आणि सुरक्षा जाणीव जनजागृती कार्यशाळेत बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे. - Divya Marathi
सायबर गुन्हे आणि सुरक्षा जाणीव जनजागृती कार्यशाळेत बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे.

पाथर्डी- आज प्रत्येकाकडे मोबाइल आहे. व्हॉटस्अॅप, फेसबुक, ट्विटरचा वापर वाढत आहे. तथापि, सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने जागरूक असले पाहिजे, असा सल्ला उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे यांनी दिला. 


'ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र' अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आणि बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सायबर गुन्हे आणि सुरक्षा जाणीव जनजागृती कार्यशाळेतून ते बोलत होते. 


प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यशाळेला मिळाला. सायबर सेलचे पोलिस निरीक्षक सुनील पवार, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, प्राचार्य जी. पी. ढाकणे, माहिती अधिकारी गणेश फुंदे, पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण, प्रा. डॉ. बबनराव चौरे, प्रा. अशोक शिंदे, प्रा. भगवान सांगळे, प्रा. प्रशांत साळवे यावेळी उपस्थित होते. 


निरीक्षक पवार यांनी सायबर सुरक्षेची गरज, सायबर गुन्ह्यांचे प्रकार, बॅँकविषयक फसवणूक, ओटीपीसंदर्भात घ्यायची दक्षता, हॅकिंग, ऑनलाइन फ्रॉड टाळण्यासाठी घ्यायची दक्षता, सोशल मीडिया वापरताना घ्यायची दक्षता, क्रेडिट, डेबिट कार्ड याबाबत माहिती दिली. बॅँक व्यवहार किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहारांची माहिती त्रयस्थ किंवा अनोळखी व्यक्तीला देऊ नका. टेलिफोनवर कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात सायबर सेलकडे आलेल्या तक्रारींची माहिती त्यांनी दिली. इंटरनेटवर चॅटिंग करताना अनोळखी व्यक्तीशी संवाद करणे टाळा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. 


प्रास्ताविकात प्राचार्य ढाकणे यांनी केले. चव्हाण यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. 'आपले पोलिस आपली अस्मिता' या लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यशाळेला ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, राजेंद्र सावंत, नारायण पालवे, बाबासाहेब गर्जे, अमोल कांकरिया आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...