आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसिद्ध कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक वसंतलाल गांधी यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरमधील प्रसिद्ध कोहिनूर वस्त्रदालनाचे संचालक वसंतलाल गांधी (वय ८५) यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा प्रदीप गांधी, मुलगी जयश्री मुनोत, नातू अश्विन गांधी, नात मधुर जैन, सून, नातसून व नातवंडे असा परिवार आहे. गांधी यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. त्यांच्यावर दुपारी अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी शहरातील सर्व क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. वसंतलाल गांधी धार्मिक व मनमिळाऊ वृत्तीचे होते. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. 

बातम्या आणखी आहेत...