आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये बँकेचे 11 लाख रुपये लुटले, दुचाकीवरून 4 चोरटे फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर - अहमदनगरमध्ये यूनियन बँकेच्या सावेडी शाखेची ११ लाखांची रक्कम दोन दुचाकींवरील चार चोरट्यांनी लुटली. सकाळी ११.३० च्या सुमारास नगर-सोलापूर रस्त्यावर चांदणी चौकाजवळ ही घटना घडली.


निमगाव गांगर्डा येथील युनियन बँकेच्या शाखेसाठी ही रक्कम कारमधून नेण्यात येत होती. गाडीत शाखा व्यवस्थापक व शिपाई हे दोघेच होते. ते चांदणी चौकापासून सोलापूर महामार्गाकडे वळल्यावर मागून आलेल्या पल्सर मोटारसायकलीने त्यांच्या गाडीला हूल देत अपघात झाल्याचा बहाणा केला. दोघांनी कार थांबवण्यास भाग पाडले. व्यवस्थापक स्वत: गाडी चालवत होते. दुचाकीस्वाराने वाद घालत व्यवस्थापकास बाहेर येण्यास भाग पाडले. त्याच वेळी समोरून आणखी एक दुचाकी आली. त्यावरील एकाने शिपाई बसलेल्या बाजूची काच फोडून व त्याचा गळा दाबून पायाजवळची रोकड असलेली पिशवी पळवली.

बातम्या आणखी आहेत...