आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकखात्यातून 12 मिनिटांत 12 हजार गायब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - हिरडगाव येथील महेश दत्तात्रेय दरेकर ऊर्फ पप्पू याचे घोडेगाव येथील कॅनरा बँकेच्या शाखेत बचत खाते अाहे. गुरूवारी सकाळी ९६४७६९८००३ या मोबाइलवरुन त्याला फोन आला. घोडेगाव येथील कॅनरा बँकेचे तुमचे एटीएम बंद पडले आहे. ते चालू करण्यासाठी एटीएम आणि आधार नंबर पाहिजे, असे सांगितल्यावर महेशने ते दोन्ही नंबर दिले. लगेच त्याच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने १२ मिनिटांत ११ हजार ८०० रुपये गायब झाले.


फक्त ८.२० रुपये शिल्लक राहिले. याच बँकेतून बापू दिनकर गोरे (घोडेगाव) यांचे ४० हजार रुपये असेच गायब झाले. या प्रकारामुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकाराम दरेकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...