आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुरीतील बेपत्ता मुलीचा गळा आवळून खून, पोलिसांकडे अद्याप कोणतेही धागेदोरे नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राहुरी तालुक्यातील टाकळीमिया शिवारात मृतदेह सापडलेल्या १३ वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे शवविच्छेदन अहवालात मंगळवारी स्पष्ट झाले. खून करण्यापूर्वी या मुलीवर अत्याचार झाला की नाही, याबाबतचा अहवाल येण्यास मात्र आणखी वेळ लागेल. हात, पाय व तोंड नसलेला मृतदेह सोमवारी आढळला. हा मृतदेह आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांच्या हाती अद्याप काहीच लागलेले नाही.

 

टाकळीमिया येथील मुसळवाडी तलावाजवळ रहात असलेले रोहिदास वाघ यांची मुलगी मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होती. आई-वडिलांनी शोध घेऊनही उपयोग लागला नाही. सोमवारी सकाळी परिसरातील महिला तलावालगत सतीश शंकर सोनवणे यांच्या उसाच्या शेतात गवत कापण्यासाठी गेली. त्यावेळी तिला मृतदेह दिसला. महिलेने आरडाओरड करताच ग्रामस्थ जमा झाले. राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, सहायक निरीक्षक लक्ष्मण भोसले हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच रोहिदास वाघ घटनास्थळी आले. मृतदेह आपल्या मुलीचा असल्याचे त्यांनी सांगितले. मृतदेहाचे घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल मंगळवारी दुपारी मिळाला. मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले. खून करण्यापूर्वी अत्याचार झाले का, याबाबतचा अहवाल येण्यास आणखी कालावधी लागणार आहे.

 

तक्रार नाही
प्राथमिक तपासात पोलिसांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मुलगी आठ दिवसांपासून बेपत्ता आहे, अशी कोणतीही तक्रार संबंधित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेली नव्हती. शवविच्छेदनाचा लेखी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणाच्या पुढील तपासाला गती मिळणार असल्याची माहिती राहुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना दिली.

 

बातम्या आणखी आहेत...