आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाबार्डकडून निळवंडे कालव्यांसाठी १८९ कोटी; राधाकृष्ण विखे यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने निळवंडे कालव्यांसाठी १८९ कोटींचा निधी देण्यास मान्यता दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी गुरूवारी दिली. 


नाबार्डच्या योजनेत निळवंडेचा समावेश होऊ शकतो, असा अभिप्राय जलसंपदाच्या नागपूरच्या अभियंत्यांनी दिल्यानंतर जलसंपदा विभागाच्या उत्तर महाराष्ट्र मुख्य अभियंत्यांनी निधीचा प्रस्ताव नाबार्डकडे सादर केला होता, असे विखे यांनी सांगितले. 


निळवंडे कालव्यांसाठी नाबार्डचा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी २९ डिसेंबर २०१७ रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पत्र देऊन हा निधी तातडीने उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत असा आग्रह आपण सातत्याने धरला होता. नाबार्डच्या योजनेत निळवंडे प्रकल्पाचा समावेश होऊ शकल्याने आता सर्व प्रशासकीय बाबीचे अवलोकन करून नाबार्डने हा निधी मंजूर करण्यास हिरवा कंदील दिला असून, निधी मंजूरीचे पत्रही राज्य सरकारला प्राप्त झाल्याने निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी १८९ कोटी होतील. यातून कालव्यांच्या कामांना सुरूवात करतात येईल, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...