आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगरमध्‍ये पुन्‍हा हत्‍याकांड; जामखेडमध्ये तिघांच्या गोळीबारात 2 ठार, हल्‍लेखोर पसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत राकेश राळेभात व योगेश राळेभात. - Divya Marathi
मृत राकेश राळेभात व योगेश राळेभात.

जामखेड - जामखेड शहरातील बीड रस्त्यावरील बाजार समिती परिसरातील एका हॉटेलसमोर तीन अज्ञात हल्लेखोरांनी मोटारसायकलीवर येऊन केलेल्या सिनेस्टाईल अंदाधुंद गोळीबारात योगेश अंबादास राळेभात (२८) व राकेश अर्जुन राळेभात (२३) या दोघांचा मृत्यू झाला. योगेशला चार, तर राकेशला दोन गोळ्या लागल्या होत्या. घटनेनंतर योगेशचा लगेच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या राकेेशचा नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

शनिवारी जामखेडचा आठवडा बाजार असल्याने गर्दी होती. बाजार समिती परिसरात बाजारकरूंसह नागरिकांची मोठी वर्दळ होती. योगेश राळेभात व राकेश राळेभात हे सायंकाळी ६ वाजता मित्रांसह बाजार समिती परिसरातील एका हॉटेलवर थांबले होते. तेवढ्यात तोंडाला काळे रूमाल बांधून एका मोटारसायकलीवरून तिघे हल्लेखोर आले. त्यापैकी एकाने खाली उतरून राळेभात यांच्यावर गोळ्या झाडल्या. तोपर्यंत दोघे मोटारसायकलीवर बसून राहिले. त्याच वेळी तेथे एका लग्नाच्या वरातीचा डीजे वाजत होता. त्यामुळे गोळीबाराचा आवाज इतरांना आला नाही. योगेशला चार, तर राकेशला दोन गोळ्या लागल्या. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले. दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. योगेश हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी सरचिटणीस होता. 

 

शनिवार... घातवार... 
केडगाव येथील शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड शनिवारीच ७ एप्रिलला घडले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा शनिवारी पिस्तुलातून गोळ्या झाडून जामखेडला दोघांची हत्या करण्यात आली. या घटनांमुळे पोलिस खाते हादरले आहे.

बातम्या आणखी आहेत...