आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंटेनरला आग लागून 27 दुचाक्या भस्मसात, 40 लाखांहून अधिक नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव- म्हैसूर येथून पलवलकडे (हरियाना) टीव्हीएस कंपनीच्या दुचाकी नेणाऱ्या कंटेनरला रविवारी लागलेल्या आगीत २७ गाड्या जळून खाक झाल्या. ४० लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पाथर्डी नगरपरिषदेचा बंब वेळेवर आल्याने मोठा अनर्थ टळला. 


दुपारी ४ च्या दरम्यान कंटनेर (एमएच २० डीई ७६९८) भुसारी पेट्रोल पंपाजवळ थांबला. चालक अरुण बापू माळवदे (ढोरसडे, ता. शेवगाव) चहा पिण्यासाठी उतरले असता त्यांना कंटेनरमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसले. कंटेनरचा दरवाजा उघडला असता आतील दुचाक्या पेटल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्निशमन दल व पोलिसांना फोन केला. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र, कंटेनरच्या वरच्या भागातील २३ व खालील ४ अशा २७ दुचाक्या जळून खाक झाल्या. कंटेनरचेही मोठे नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार या गाड्यांची किंमत ३५ ते ४० लाखांच्या दरम्यान असल्याचे समजते. 

बातम्या आणखी आहेत...