आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईतेज हॉटेलवर छापा; जुगार खेळणाऱ्या 28 जणांना अटक; नगरसेवक, सरपंच, जि.प.सदस्यांचा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव- नगर-मनमाड महामार्गावरील साईतेज हॉटेलवर सहायक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाचे सहायक निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्प्यात जुगार व पत्ते खेळणाऱ्या २८ जणांना रंगेहाथ पकडून १ लाख ८३ हजार रोख, २९ मोबाइल, सहा चारचाकी व दहा दुचाकी वाहने, असा मिळून ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 


याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. आरोपींमध्ये आजी-माजी नगरसेवक, सरपंच, पंचायत समितीचे उपसभापती व जिल्हा परिषद सदस्यांचा समवेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


हॉटेलवर छापा पडताच एकच पळापळ झाली. चार-पाच आरोपी पळून गेले. अटक केलेल्यात हॉटेलमालक अस्लम सलीम सोनेवाला (मनमाड), रोहित हमीद खान (येवला), वसंत वढे (येवला), वाल्मिक भगत कोळपे (कोळपेवाडी), बबलू अब्दुल शेख (मालेगाव), श्रीराम पंढरीनाथ लाटे (शिवूर, वैजापूर), निस्सार अन्सार शेख (येवला), तुषार नारायण मेहेरखांब (सुरेगाव), शकील आरिफ अन्सारी (नाशिक), विवेक अनिल घोडके (मनमाड), सनिश वसंत सोनवणे (वैजापूर), दयानंद रतन जावळे (येवले), संजय दिनकर निकम (मनमाड), कैलास हिरालाल जेजुरकर (अंदरसूल), समद रशीद शेख (एरंडगाव), एत्तेफाश गुलजार शहा (वैजापूर), नीलेश गोपीनाथ लोंढे (येवला), नीलेश रायभान कापसे (अंदरसूल), सुनील सूर्यभान खडांगळे (येवला), नवनाथ भास्कर मोरे (गोधेगाव), मनोज मधुकर पानगव्हाणे (निफाड), गुलाब महंमद हनिफ शहा (मनमाड), मनोज प्रभाकर दानी (येवला), शिवा नाना हिरे (येवले), सचिन श्यामलाल बिवाल (येवले), वामन देवमन मेहेरखांब (सुरेगाव), गंगाधर मधुकर चव्हाण (निफाड), बालाजी सटवाजी मेढे (नांदेड) यांचा समावेश आहे. 


गुप्त बातमीदारामार्फत कलवानिया व पाटील यांना या अड्ड्याची माहिती मिळाली. ग्रामीण पोलिस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सुधीर पाटील, बाळासाहेब मुळीक, संदीप घोडके, विशाल गवांदे, दिनेश मोरे, अण्णा पवार, मेघराज कोल्हे, चालक बबन बेरड, तसेच सहायक फौजदार कल्याण शेळके, बी. आर. परकाळे, गणेश धुमाळ, बाबासाहेब काकडे, किरण अरकल, अण्णा डाके, धनंजय करंडे, चालक अर्जुन बढे आदींचा या पथकात समावेश होता. या कारवाईने शहरात खळबळ उडाली.

बातम्या आणखी आहेत...