आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईंच्या तिजाेरीत ३५० काेटी रुपयांचे दान; वर्षभरात झाली तब्बल १४० काेटींची वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या साईबाबा संस्थानच्या दानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या २०१७-१८ आर्थिक वर्षात जगभरातून आलेल्या साईभक्तांनी साई संस्थानला तब्बल ३५० कोटी रुपयांचे भरभरून दान दिले आहे. विशेष म्हणजे देशात नोटबंदीचा कोणताही परिणाम साईबाबांच्या दानावर झालेला नाही. संस्थानच्या तिजोरीत गेल्या वर्षीचा सन २०१६-१७ ला दानाचा आकडा हा २१० कोटी होता. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात भक्तांनी साईच्या तिजोरीत १४० कोटींहून अधिक दान दिले आहे. 


देशात सर्वाधिक श्रीमंत संस्थान म्हणून तिरुपतीची गणना केली जाते, तर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून शिर्डीच्या साईबाबांची गणना केली जात आहे. शिर्डीला गेल्या काही वर्षांतील दानाच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी नोटबंदी केल्यानंतरही दानाच्या आकड्यात कोणतीही कमी झाली नाही. साई संस्थानला वस्तूंपासून ते सोन्यापर्यंत साईभक्त दान चढवतात. गेल्या आर्थिक वर्षात साई संस्थानला साईभक्तांनी तब्बल ३५० कोटी रुपयांचे दान दिले आहे. त्याच्या मागच्या वर्षीचा आकडा हा २१० कोटी होता. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात भक्तांनी साईच्या तिजोरीत १४० कोटींहून अधिकची भर पडली आहे. साई संस्थानच्या गंगाजळीचा आकडा आता २ हजार कोटींच्या वर गेला असून यात आणखी वाढच होण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...