आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल व ढाब्यांच्या तपासणीत सापडले 43 वीजचोर ग्राहक, नगर ग्रामीण विभागात विशेष मोहीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महावितरणच्या नगर ग्रामीण विभागात राबवण्यात आलेल्या हॉटेल व ढाब्यांचा विशेष तपासणी मोहिमेत ४३ ठिकाणी वीजचोरी आढळून आली. संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही व दंड ना भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात व्यापक स्वरूपात व सातत्याने ही मोहीम राबवण्यात येणार अाहे. रितसर जोडणी घेऊन वीजवापर करण्याचे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.

 

मुख्य अभियंता जनवीर यांच्या सूचनेनुसार अधीक्षक अभियंता संतोष सांगळे व कार्यकारी अभियंता राजेंद्र साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली नगर ग्रामीण विभागांतर्गत नेवासे, पाथर्डी व शेवगाव तालुक्यात वीज चोरीविरुद्ध मोहीम उघडण्यात आली. विशेषतः रस्त्यालगतचे हॉटेल, ढाबे या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेतून घोडेगाव उपविभागात ११, नेवासे उपविभागात १६, पाथर्डी उपविभागात १२, शेवगाव उपविभागात ४ अशा एकूण ४३ ठिकाणच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या. नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीचा पूल ते प्रवरा संगम दरम्यानच्या सर्व हॉटेल, दुकाने यांची तपासणी करण्यात येत आहे. घोडेगाव उपविभागात ११, तर नेवासे उपविभागात ९ हॉटेलमध्ये वीजचोरी आढळून आली. या सर्वांविरुद्ध त्यांनी केलेल्या चोरीच्या विजेचे बिल, तसेच दंडाचे देयक देण्यात येत आहे. ही रक्कम न भरणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

 

जिल्ह्याची गेल्या आर्थिक वर्षाची वीज वितरण हानी १८.३४ टक्क्यांवर पोहोचली आहे. ही हानी कमी करण्यासाठी वीजचोरीला अटकाव करणे आवश्यक आहे. मुख्य अभियंता जनवीर यांनी जिल्हाभर व्यापक मोहीम राबवून वीज चोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना दिले आहेत. या मोहिमेत सहकार्य करून वीजचोरांची माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.

 

या मोहिमेत उपकार्यकारी अभियंता विजय खताळ, रमेश पालवे, प्रतीक सरोदे, आदित्य पिंपळगावकर, आनंद किरपेकर, लक्ष्मी शिंदे, तंत्रज्ञ दिनेश ठाकरे, बाबासाहेब दहातोंडे, पल्लवी बाँबटकर, ज्ञानेश्वर सुरवसे, गोपीनाथ जाधव, सुनील खंडागळे, सोमनाथ टिक्कल, संभाजी व्यवहारे, करण मोकळ आदी सहभागी झाले.

 

बातम्या आणखी आहेत...