आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांच्या बालिकेचा वृद्धाकडून विनयभंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आश्वी- पाच वर्षांच्या मुलीचा ६० वर्षांच्या वृध्दाने विनयभंग केल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील माळेवाडी येथे उघडकीस आला. शेतमजूर महिलेची मुलगी शेतात खेळत असताना किसन गजाबा जाधव याने तिला मारुती मंदिरात नेऊन अश्लील चाळे केले.

 

मुलीच्या रडण्याचा आवाज शेजारून जाणाऱ्या अशोक विलास जाधवने ऐकला. त्याने किसनला काय करतो, असे विचारल्यावर तो पळाला. पीडित मुलीला आईच्या ताब्यात देऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलिस निरीक्षक अनिल कटके, उपनिरीक्षक दत्तात्रय उजे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकाॅन्स्टेबल एकनाथ बर्वे, मच्छिंद्र शिरसाठ, भारत जाधव यांनी आरोपीला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...