आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतिमंद पुतणीवर बलात्कार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - मतिमंद पुतणीवर बलात्कार करणाऱ्या भागाजी संतू हासे (वय ५०) याला संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. बुधवारी या खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी आरोपी आणि फिर्यादी पक्षाकडील लोकांनी न्यायालयात गर्दी केली होती. १४ ऑक्टोबर २०११ रोजी ही घटना राजापूर येथे घडली.


तक्रार दाखल झाल्यावर तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी तपास करत भागाजी हासे याला अटक केली होती. निरीक्षक सावंत यांनी आरोपीविरोधात संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश संजीव शर्मा यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी आरोपीविरोधात भक्कमपणे न्यायालयात बाजू मांडली.

 

न्यायाधीश शर्मा यांनी पुरावे पडताळून पहात आरोपी भागाजी हासे याच्यावरील आरोप मान्य करत त्याला दहा वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास आरोपीला आणखी सहा महिने शिक्षा भोगावी लागेल. पोलिस उपनिरीक्षक पी. एच. खोसे यांनी न्यायालयात वस्तुस्थिती मांडत आरोपी हासे याला शिक्षेपर्यंत नेण्यास मदत केली.

बातम्या आणखी आहेत...