आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खान, किरण यांची आष्टीला भेट; वॉटर कप स्पर्धेचा आढावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी - मंगळवारी नगर जिल्ह्यातील जोगेवाडी गावाच्या दौऱ्यावर असलेले चित्रपट अभिनेता आमिर खान, पत्नी किरण राव यांनी रात्री आष्टी येथे मुक्काम केला. बुधवारी सकाळीच आष्टी तहसीलला भेट देत त्यांनी  तहसीलदारांकडून वॉटर कप स्पर्धेचा अर्धा तास आढावा घेतला. आमिर खान यांची ही सरप्राइज व्हिजिट ठरली. आमिर खान आष्टीत असल्याचे कळताच त्यांच्या चाहत्यांनी जणू तहसीलला गराडाच घातला.


नगर जिल्ह्यातील जोगेवाडी गावाला मंगळवारी चित्रपट अभिनेता आमिर खान व पत्नी किरण खान-राव या दोघांनी  भेट  देत श्रमदान केले होते. रात्री मुक्कामासाठी बारा वाजता  दोघे  आष्टी येथील साई लॉजवर आले होते. सकाळी सहा वाजता  आमिर खानने तहसील कार्यालयाला भेट देऊन आष्टी तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेचा  अर्धा तास आढावा घेतला. आष्टी तालुका  यंदा प्रथमच पाणी फाउंडेशनच्या  वाॅटर कप स्पर्धेत सहभागी  झाला असून तालुक्यातील ११३  गावे सहभागी झाली आहेत. सध्या तालुक्यातील  ४० गावांत  श्रमदान सुरू आहे.  आगामी काळात चांगल्या पद्धतीने कसे काम करता येईल, या दृष्टीने  आमिर खान यांनी सूचना दिल्या.

 

उर्वरित गावांनी कामाला लागावे
आष्टी तालुक्यातील करंजी, आनंदवाडी, वाहिरा, खडकत, चिंचाळा, टाकळसिंग या सात गावांसह उर्वरित ४०  गावांतही कामे सुरू आहेत.  तालुक्यातील ११३ गावांनीदेखील आता कामाला लागावे, असे आवाहन आमिर खान यांनी केले आहे.

 

एक दिवस श्रमदान
आष्टी तालुक्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी विभागनिहाय  १७ एप्रिल ते ५ मे २०१८ दरम्यान एक दिवस श्रमदान करणार आहेत, अशी माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी  दिली.

 

बातम्या आणखी आहेत...