आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये पुणे बाह्यवळण महामार्गावर तवेराची दुचाकीला धडक; 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातग्रस्त तवेरा. - Divya Marathi
अपघातग्रस्त तवेरा.

अहमदनगर- केडगाव येथे बाह्यवळण महामार्गावर तवेरा गाडीला झालेल्या भीषण अपघातात 3 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाले आहेत. आकाश उद्धव गुंड, सुमीत शांताराम खामकर, निलेश रघुनाथ खेडे अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही बारावीचे विद्यार्थी होते. 

 

 

दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या तवेरा गाडीचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजक ओलांडून ही गाडी एका दुचाकीला धडकली. त्या धडकेत दुचाकीवरील तिघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...