आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल विषारी दारूकांडप्रकरणी दोन पोलिस बडतर्फ; रंजनकुमार शर्मा यांची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर तालुक्यातील पांगरमल येथील विषारी दारूकांडप्रकरणी दोन पोलिसांना बडतर्फ करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारी ही कारवाई केली. कॉन्स्टेबल जितेंद्र दत्तात्रेय गायकवाड व पोलिस नाईक शब्बीर बशीर शेख अशी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलिस हवालदार भानुदास बांदल, हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले व राजेंद्र गर्गे यांची वेतनवाढ एक वर्षासाठी रोखण्यात आली आहे. 


सन २०१६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारादरम्यान नगर जिल्ह्यात हे विषारी दारूकांड घडले. पांगरमल या एकाच गावात विषारी दारू प्राशन केल्याने नऊजण दगावले. नंतर हा आकडा १४ वर गेला. याप्रकरणी निष्काळजीपणा व हयगयीचा ठपका ठेवत दोघांना निलंबित, तर ६ पोलिसांच्या मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार कायम होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर ३० जून रोजी पोलिस अधीक्षकांनी दोघांच्या बडतफीचे आदेश काढले. या आदेशाविरूध्द ४५ दिवसांच्या आत विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे अपील करण्याची मुदत देण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...