आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना सत्तेत पहारेकऱ्याच्या भूमिकेत, याच वर्षी सत्तेला लाथ मारणार: आदित्य ठाकरेंचे वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- शिवसेना सत्तेत पहारेकऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे यावर्षी कदाचित सत्तेला लाथ मारू, असे वक्तव्य युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज अहमदनगरमध्ये केले. सत्तेतून बाहेर पडण्याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

काँग्रेस, राष्ट्रवादीवर भाष्य नाही

सावेडीत ठाकरे यांचा रोड शो आणि सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपवर नाव न घेता टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. 'गुजरातमधील सभांमध्ये खुर्च्या रिकाम्या दिसतात. तसे शिवसेनेच्या कोणत्याही सभेत होत नाही,' असे ते म्हणाले. शिवसेना विरोधी पक्षात नाही, परंतु सत्तेत पहारेकरी आहे. चांगल्या कामांचे कौतुक करतानाच चुकीच्या कामांना रोखण्याचे काम केले जाते, असेही ते म्हणाले. विद्यार्थी, महिला, व्यापारी कोणीही सत्ताधाऱ्यांवर खूश नाही.

 

 

त्यामुळे सत्तेला लाथ मारणार

नोटाबंदीच्या काळात एकही श्रीमंत व्यक्ती रस्त्यावर दिसली नाही. काळा पैसा बाहेर निघाला नाही, पण महिलांनी बचत करून ठेवलेले पैसे काळे धन म्हणून दाखवले गेले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती हवी आहे, पण कर्जमाफीही धड दिली जात नाही, त्यामुळे याच वर्षी शिवसेना सत्तेला लाथ मारणार आहे. याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...