आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायणगव्हाण येथील अपघातात; महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण येथील वेताळवस्तीलगत वॅगनर दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. दोघेजण गंभीर जखमी झाले. 


गुरूवारी सकाळी ८.३० वाजता पुण्याहून नगरच्या दिशेने येणारी मारूती वॅगनर (एमएच - १४, जी एच ४८२१) भरधाव वेगात असताना वळणाचा अंदाज न आल्याने दुभाजकाला धडकली. मागील डाव्या बाजूचा टायर फुटून दोन-तीन पलट्या घेऊन गाडी नाल्यामध्ये गेली. राजेंद्र शेळके यांच्यासह ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नर्मदा पंढरीनाथ थोरवे (४३, आळंदी, जि. पुणे) यांच्या डोक्याला डाव्या बाजूस जबर मार लागला असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारचालक निर्वाण पंढरीनाथ थोरवे (वय २१), पंढरीनाथ तात्याराव थोरवे ( वय ४७, दोघे आळंदी) गंभीर जखमी झाले. जखमींना नगर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...