आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनात राजकीय पक्षांची मदत घेणार नाही: अण्णा हजारेंचे स्‍पस्‍टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भ्रष्टाचाराला लगाम घालणारा लोकपाल व लोकायुक्त कायदा जनतेच्या दबावामुळे सरकारने बनवला. पण काँग्रेसने हा कायदा कमकुवत केला, तर मोदी सरकारने हा कायदा अधिक कमकुवत करून त्यातील आत्मा काढून घेतला. त्यामुळे सक्षम लाेकपालसाठी अापण २३ मार्चला शहीददिनी पुन्हा अांदाेलन करणार अाहाेत. त्यासाठी दिल्लीत जागा मिळावी म्हणून अापण  पंतप्रधान व गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी जर जागा दिली नाही, तर जेलमध्ये आंदोलन करेन, असा निर्धार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. तसेच या आंदोलनासाठी कोणत्याही पक्षाची मदत घेणार नसल्याचेही स्पष्ट केले. 


अहमदनगरमध्ये अण्णा हजारे म्हणाले, याबाबत माझ्या अनेक राज्यांत सभा झाल्या आहेत. लोकपाल, लोकायुक्त हा कायदा जनशक्तीच्या दबावामुळे सरकारने बनवला, पण काँग्रेस सरकारने हा कायदा कमकुवत केला. त्यानंतर मोदी सरकारने तो अजून कमकुवत केल्याने या कायद्यातील जीव निघून गेला. त्यामुळे मी आता जनतेमध्ये जागृती करत आहे.


सर्व पक्ष स्वार्थी असून त्यांना समाज व देशाचे काही देणेघेणे नाही. आम्ही कोणत्याही पक्षाची मदत घेत नाही. सारे पक्ष स्वार्थी असून केवळ मतांसाठीच ते बोलतात. त्यांच्यासमोर समाज व देश असता, तर देशाची अशी अवस्था ७० वर्षात झाली असती का, असा सवालही अण्णा हजारे यांनी केला आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...