आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रातील माेदी सरकारविराेधात अण्णांचा पुन्हा उपाेषणाचा इशारा; 2 ऑक्टोबरपासून उपोषण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारविरोधात पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला अाहे. दोन ऑक्टोबरपासून ते राळेगण सिद्धी येथे उपोषणास बसणार अाहेत. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांना याबाबतचे पत्र अण्णांनी पाठवले आहे. 'पंतप्रधानांनी निवडणुकीत आश्वासन दिले होते की, आमचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करू, शेतीमालाला दीडपट भाव दिला जाईल. केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त नियुक्त करू, असेही सांगितले होते. मात्र त्याची अद्याप पूर्तता झाली नसल्याचे हे अांदाेलन केले जात अाहे,' असे पत्रात म्हटले अाहे. 


लोकपाल व लोकायुक्तांसाठी १६ ऑगस्ट २०११ ला मी दिल्लीत रामलीला मैदानात चौदा दिवस उपोषण केले. २३ मार्च २०१८ च्या उपोषणाच्या सातव्या दिवशी पंतप्रधान कार्यालयातून राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रात काही मुद्द्यांवर आश्वासन दिले होते. तथापि, पत्राप्रमाणे एकही मागणी मान्य झाली नाही. त्यासंबंधी कोणती कारवाई केली नाही. सरकारला सत्तेवर येऊन ४ वर्षे झाली आहेत. निवडणुकीअगोदर दिलेली आश्वासनेही सरकारने पाळली नाहीत. ही जनतेची फसवणूक आहे. नरेंद्र मोदी यांनी दिलेले भ्रष्टाचारमुक्तीचे आश्वासनदेखील त्यांनी पाळले नाही. दिल्लीतील उपोषण सोडल्यानंतर दोन वेळा स्मरणपत्र सरकारला पाठवले, परंतु कुठले उत्तर मिळाले नाही. म्हणून हे तिसरे स्मरणपत्र पाठवले असून २ ऑक्टोबरपर्यंत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, तर राळेगण सिद्धी येथे आपण उपोषण सुरू करणार असल्याचे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. त्याच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनाही पाठवल्या आहेत. दरम्यान, अण्णांचे ह उपोषण किती दिवस चालते हे येत्या काळात स्पष्ट होईल. 

बातम्या आणखी आहेत...