आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नही हवेत : विशेष पोलिस उपमहानिरीक्षक कृष्णप्रकाश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जसे मोठी स्वप्ने पाहणे आवश्यक आहे, तसेच ती साकार करून यशस्वी होण्यासाठी, चांगले नागरिक होण्यासाठी प्रयत्न करणेही गरजेचे आहे, असे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी रविवारी सांगितले. स्नेहालय युवा निर्माण प्रकल्प संचलित मनीष अकादमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कंेद्राच्या वतीने पोलिस लॉनमध्ये आयोजित प्रेरणा महोत्सवात ते बाेलत होते. 


यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, अॅड. श्याम असावा, सुनील रामदासी आदी उपस्थित होते. मनीष कला अकादमीतील विद्यार्थ्यांनी जिद्दीने, चिकाटीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. या विद्यार्थ्यांचा कृष्णप्रकाश यांच्या हस्ते सत्कार करण्यात अाला. 


यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे गरजेचे आहे, असे पोलिस अधीक्षक शर्मा यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी नगरमधून जात असताना पोलिस अधीक्षक कार्यालय आवडले होते. कधीतरी येथील कारभार पाहू, असे त्यावेळी मनात आले होते, याची आठवण त्यांनी सांगितली. 

बातम्या आणखी आहेत...