आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खताळ यांचा उद्या अभीष्टचिंतन सोहळा; पालकमंत्री राम शिंदे, सप्तर्षींची उपस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- राजकारण आणि समाजकारणात दिशादर्शक काम करत आपल्या तत्त्वांशी ठाम राहणारे संगमनेरचे भूमिपुत्र बी. जे. खताळ यांचा शतक महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा शनिवारी (२६ मे) होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते खताळ यांचा गाैरव होणार अाहे. 


  /> मालपाणी लॉन्सवर सकाळी दहा वाजता हा समारंभ होईल. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. एम. एस. गोसावी यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील. खताळ यांनी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात विविध खात्यांची मंत्रिपदे भूषवली. राज्याच्या राजकारणात त्यांच्या स्वतंत्र विचारांची आजही आेळख आहे. आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड न करणाऱ्या खताळ यांनी शेती, सहकार, सिंचनासह आर्थिक क्षेत्रासाठी घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम आजही अनुभवण्यास मिळतात. राज्यात विविध धरणांची निर्मिती, नालाबंडिंग, संगमनेरमधील साखर कारखाना, सह्याद्री शिक्षण संस्था, बाजार समिती, जिल्हा बँक आदींच्या निर्मितीत त्यांचे योगदान आहे. त्यांच्या विचारांची आेळख आजच्या पिढीला व्हावी, यासाठी या अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 


स्वच्छ, पारदर्शी विचारांचा आदर्श निर्माण करणाऱ्या खताळ यांच्या व्यक्तिमत्त्वातील मूल्ये आज समाजात कोठेही दिसत नाहीत. वयाच्या शंभरीतही आपल्या विचारांवर ठाम असलेला हा नेता त्यामुळेच राज्यात लौकिकास पात्र ठरला. विविध संघटना, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी आदींच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...